श्रीरामकृष्ण परमहंस · भक्ती, ज्ञान आणि कर्म
प्रेमाचे तीन प्रकार
“प्रेम तीन प्रकारचे असते: स्वार्थी, परस्पर आणि निःस्वार्थी. स्वार्थी प्रेम सर्वांत खालचे. ते फक्त स्वतःच्या सुखाकडे पाहते; प्रिय व्यक्तीचे बरे होवो की वाईट. परस्पर प्रेमात प्रेम करणाऱ्याला प्रिय व्यक्ती सुखी असावी असे वाटते, पण प्रेम करणाऱ्याचे स्वतःच्या सुखाकडेही लक्ष असते. निःस्वार्थी प्रेम सर्वोच्च प्रकारचे. त्यात प्रेम करणाऱ्याला फक्त प्रिय व्यक्तीच्या भल्याची काळजी असते.”