श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्या
आधी ताप, मग क्विनाइन
“ज्ञान एकदम देता येत नाही. ते मिळायला वेळ लागतो. समजा, ताप खूप कडक प्रकारचा आहे. तेव्हा वैद्य क्विनाइन देऊ शकत नाही; त्याचा काही उपयोग होणार नाही, हे त्याला ठाऊक असते. आधी रोग्याचा ताप उतरायला हवा, आणि त्याला वेळ लागतो. मग क्विनाइनचा उपयोग होतो. कधी कधी तर रोग्याला क्विनाइन किंवा दुसरे कोणतेही औषध न देताच ताप निघून जातो. “ज्ञान शोधणाऱ्या माणसाचेही अगदी असेच आहे. त्याचे मन संसारात बुडलेले असेपर्यंत त्याला दिलेली धर्माची शिकवण पुष्कळदा वाया जाते. काही काळ त्याला संसारातल्या गोष्टी भोगू द्या. संसारावरची त्याची आसक्ती हळूहळू झिजून जाईल. आणि नेमक्या त्याच वेळी त्याला दिलेली कोणतीही धर्माची शिकवण फळाला येते. तोपर्यंत ती फेकून दिल्यासारखीच.”
येथे ज्ञान म्हणजे देवाचे ज्ञान. क्विनाइन हे हिवतापावरचे औषध होते. हिवताप हा बंगालमधला नेहमीचा ताप.