“धोब्याकडे कपड्यांचा मोठा साठा असतो, एकाहून एक भारी कपडे. पण त्यांतला एकही त्याचा नसतो. कपडे धुऊन झाले रे झाले, की त्याचा साठा रिकामा होतो. ज्यांना स्वतःचे विचार नसतात, अशी माणसे या धोब्यासारखी असतात.”
श्रीरामकृष्णांच्या काळी हिंदुस्थानात धोबी अनेक घरांचे कपडे घेऊन जाई, धुई आणि परत आणून देई.