श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्या
दुसऱ्याची ठेव
“एखादा माणूस चांगला वक्ता असतो, प्रवचनकार असतो, आणि तरी त्याची आध्यात्मिक वाढ झालेली नसते. दुसऱ्याने विश्वासाने त्याच्यापाशी ठेवलेली मालमत्ता जो उधळतो, त्याच्यासारखा तो असतो. तो इतरांना सहज उपदेश करू शकतो, कारण त्यात त्याचे स्वतःचे काहीच खर्च होत नाही. तो जे विचार सांगतो, ते त्याचे स्वतःचे नसतात, उसने असतात.”