श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्या
गुत्त्यात जाणारा गुरू
“शिष्याने स्वतःच्या गुरूची कधीही निंदा करू नये. गुरू जे सांगेल ते त्याने कसलाही प्रश्न न विचारता पाळलेच पाहिजे. बंगालीत दोन ओळी आहेत ना: ‘जरी माझा गुरू गुत्त्यामध्ये जाय, तरी माझा गुरू श्रीनित्यानंद राय.’”
नित्यानंद हे श्रीचैतन्य यांचे जवळचे सोबती होते. चैतन्य हे इ.स. १५०० च्या सुमाराचे बंगालचे वैष्णव संत. बंगाली वैष्णव नित्यानंदांना देव मानून पूजतात. राय ही मानाची पदवी आहे. याच दोन ओळी श्रीरामकृष्णांनी आणखी एका दिवशी म्हटल्या. एका कुटुंबाच्या गुरूची पत्नी बहकली होती, आणि त्या कुटुंबाला तिच्याऐवजी तिच्या मुलाला गुरू करायचे होते. श्रीरामकृष्णांनी विचारले, “ती भ्रष्ट असली, म्हणून काय झाले?” आणि त्या लोकांना याच दोन ओळी ऐकवल्या.