श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्या
परक्या देशात एकच वाटाड्या
“एकाच माणसाला गुरू का म्हणायचे, आणि तुम्हाला काही शिकवणाऱ्या प्रत्येकाला का नाही? तुम्ही अनोळखी देशात जाता, तेव्हा ज्याला वाट ठाऊक आहे, त्या वाटाड्याच्या सांगण्याप्रमाणेच चालावे लागते. पुष्कळांचे सल्ले घेतले, तर नुसता गोंधळच उडू शकतो. तसेच, देवापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताना, ज्याला देवाकडे जाणारी वाट ठाऊक आहे, अशा एकाच गुरूचा सल्ला कसलाही प्रश्न न विचारता पाळायला हवा.”