श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्या
फूल आणि मधमाश्या
“दुसऱ्यांना उपदेश करण्यात जो वेळ जाईल, तो सगळा वेळ माणसाने देवाची उपासना केली, तर तोच पुरेसा उपदेश झाला. जो स्वतः मुक्त होण्याची धडपड करतो, तोच खरा उपदेशक. जो मुक्त झाला आहे, त्याच्याकडे चारी बाजूंनी शेकडो लोक येतात, कुठून ते कुणालाच कळत नाही, आणि शिकवण घेतात. फूल उमलले की मधमाश्या चारी बाजूंनी येतात, न बोलावता, न सांगता.”
येथे मुक्त म्हणजे संसाराच्या बंधनांतून मुक्त.