“रिकाम्या घड्यात पाणी ओतले, की भुडुक भुडुक आवाज होतो. घडा भरला की तसा आवाज होत नाही. तसेच, ज्याला देव भेटलेला नाही, तो पोकळ वादविवादांनी भरलेला असतो. पण त्याला देवाचे दर्शन झाले, की हा सगळा फुकाचा अभिमान गळून पडतो, आणि मग तो मौन राहून देवाच्या आनंदात रमतो.”