श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्या
संसारी उपदेशक
“संसाराचा त्याग केल्याशिवाय कुणीही लोकशिक्षक होऊ शकत नाही. लोकांचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. ते म्हणतील, ‘हा तर संसारी माणूस. चोरून-लपून कामिनी-कांचनाचा भोग घेतो, आणि आम्हाला मात्र उपदेश करतो, की देव तेवढा खरा, आणि हे जग सरून जाणाऱ्या स्वप्नासारखे आहे.’ माणसाने सर्वस्वाचा त्याग केला नाही, तर सगळेच त्याचे बोलणे मानणार नाहीत. फार तर थोडे संसारी लोक त्याच्या मागे जातील.”
कामिनी म्हणजे स्त्री, कांचन म्हणजे सोने. येथे श्रीरामकृष्ण संसारात राहणाऱ्या पुरुषांशी बोलत होते. कामिनी-कांचन या शब्दांनी त्यांना कामवासना आणि पैशाचा मोह म्हणायचा होता.