श्रीरामकृष्ण परमहंस · गुरू आणि विद्या
वाघमुखी पन्हळ
“घराच्या छपरावर पडलेले पावसाचे पाणी पन्हळींतून खाली जमिनीवर येते. त्या पन्हळी वाघाच्या डोक्याच्या विचित्र आकाराच्या केलेल्या असतात. त्यामुळे पाणी वाघांच्या तोंडांतून येते आहे असे वाटते, पण खरे तर ते आकाशातून पडत असते. तसेच, साधुपुरुषांच्या मुखातून येणारी पवित्र शिकवण त्यांचे स्वतःचे बोलणे वाटते. पण खरे तर ती साक्षात देवाकडून येते.”
छपरावरच्या पन्हळी बहुधा एखाद्या प्राण्याच्या डोक्याच्या आकाराच्या असत: वाघ, गाय किंवा बैल. पावसाचे पाणी त्या प्राण्याच्या तोंडातून बाहेर पडे.