श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
बाळासारखे होणे
“ज्याने प्रभूंचे दर्शन घेतले, तोच खरा ज्ञानी. असा माणूस बाळासारखा होतो. वरून पाहता बाळालाही दुसऱ्यांपासून वेगळा असा स्वतःचा ‘मी’ असतो, हे खरे. पण तो ‘मी’ फक्त दिसण्यापुरता; खरा नव्हे. बाळाचा ‘मी’ मोठ्या माणसाच्या ‘मी’सारखा मुळीच नसतो. ज्ञान्याने प्रभूंचे दर्शन घेतलेले असते, आणि तो आता पूर्वीचा माणूस राहिलेला नसतो.”