श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
एक पेला की तीन बाटल्या
“काही लोकांना दारूच्या एका छोट्या पेल्यानेच झिंग चढते. इतरांना नशा चढायला दोन-तीन बाटल्या लागतात. पण दोघांनाही दारूचा पुरा आनंद मिळतो, आणि सारख्याच प्रमाणात. तसेच, काही भक्त प्रत्यक्ष विश्वाच्या स्वामींची भेट झाल्यावर स्वर्गीय आनंदाने धुंद होतात. इतरांना दैवी वैभवाची नुसती झलक दिसताच भावावस्था लागते. पण दोघेही सारखेच धन्य, कारण दोघांच्याही अंतरात देवाचा आनंद काठोकाठ भरून ओसंडत असतो.”