श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
खडीसाखरेची गोडी
“ज्याने एकदा उत्तम, स्वच्छ खडीसाखर चाखली, त्याला कच्च्या काकवीत काही गोडी वाटत नाही. जो एकदा महालात झोपला, त्याला घाणेरड्या झोपडीत पडून राहणे आवडत नाही. तसेच, ज्या जिवाने एकदा दिव्य आनंदाची गोडी चाखली, त्याला संसारातल्या हलक्या सुखांत काहीच रस वाटत नाही.”
खडीसाखर म्हणजे शुद्ध केलेल्या साखरेचे पारदर्शक खडे. येथे काकवी म्हणजे उसाचा रस आटवून केलेला काळसर, गावठी पाक.