श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
म्हातारीला हात लावा
“लपाछपीत, खेळात भाग न घेणाऱ्या म्हातारीला एखाद्या खेळाडूने एकदा का शिवले, की मग त्याला कोणी चोर करू शकत नाही. तसेच, माणसाला एकदा परमेश्वराचे दर्शन झाले, की तो संसाराच्या बेड्यांत अडकत नाही. म्हातारीला शिवलेला मुलगा हवा तिथे मोकळेपणाने जातो; कोणी त्याचा पाठलाग करत नाही; कोणी त्याला चोर करू शकत नाही. तसेच, जगाच्या या खेळाच्या मैदानात ज्याने एकदा परमेश्वराच्या पायांना स्पर्श केला, त्याला कसलेच भय नसते.”
श्रीरामकृष्ण सांगतात त्या बंगाली मुलांच्या खेळात एक जण खेळात भाग घेत नाही; त्याला बुडी, म्हणजे म्हातारी, म्हणतात. चोर म्हणजे ज्याला इतरांना पकडायचे असते तो खेळाडू. जग हे खेळाचे मैदान, हे हिंदूंचे जुने चित्र आहे: जगाला देवाची लीला, देवाचा खेळ, म्हणतात. वडीलधाऱ्यांच्या किंवा साधुपुरुषाच्या पायांना स्पर्श करणे ही भारतात आदराची खूण आहे.