श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
‘मी तुझ्या विश्वाबाहेर आहे का?’
“मी आईची अशी प्रार्थना करत असे: ‘आनंदमयी आई, तुला मला दर्शन द्यावेच लागेल!’ आणि कधी कधी अशी प्रार्थना करी: ‘हे दीनानाथा! हे जगन्नाथा! देवा, मी तुझ्या विश्वाबाहेर आहे का? मला ज्ञान नाही, भक्ती नाही, तपश्चर्येचे पुण्यही नाही. मला काहीच कळत नाही! देवा, तुझ्या अपार दयेने तुला मला दर्शन द्यावेच लागेल!’”
श्रीरामकृष्ण भक्तांना आईची प्रार्थना कशी करावी, हे शिकवत होते. “आनंदमयी आई” म्हणजे मा आनंदमयी, जगन्मातेचे एक बंगाली नाव.