श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
मुंडके छाटलेला बोकड
“बोकडाचे मुंडके छाटले, तरी त्याचे धड काही वेळ हालचाल करत राहते, त्यात जीव असल्याच्या खुणा दिसत राहतात. तसेच, पूर्णत्व पावलेल्या माणसाचा अहंकार छाटला गेला, तरी त्याचे शरीर चालू ठेवण्यापुरता जीव त्या अहंकारात उरतो. पण त्याला पुन्हा संसारात बांधण्याइतका तो उरत नाही.”
बंगालमध्ये कालीमातेला बोकडांचा बळी देत, आणि मंदिरात त्यांची मुंडकी छाटत. येथे अहंकार हा ‘मी’पणाच्या भावनेसाठी वापरलेला संस्कृत शब्द आहे.