श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
नाम ऐकताच रोमांच
“असा माणूस घ्या: श्रीहरीचे नुसते नाव ऐकताच केवळ आनंदाने त्याच्या अंगावरचा केस न् केस उभा राहतो. देवाचे नाव ऐकले की त्याच्या डोळ्यांतून प्रेमाचे अश्रू वाहू लागतात. त्या माणसाचा हा शेवटचा जन्म आहे.”
हरी हे विष्णूचे नाव, आणि प्रभू म्हणून देवाचेही. हिंदूंची श्रद्धा अशी की जीव मुक्त होईपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेतो. शेवटच्या जन्मातला माणूस पुन्हा जन्माला येणार नाही.