श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
नीट शिजलेला बटाटा
“सिद्ध माणूस कोणत्या अवस्थेला पोचतो? बटाटा किंवा वांगे सिद्ध झाले, म्हणजे नीट शिजले, की मऊ होते, लगद्यासारखे होते. तसेच, जो माणूस सिद्ध झाला आहे, ज्याला पूर्णत्व लाभले आहे, तो आतून-बाहेरून नम्र आणि कोमल झालेला दिसतो.”
सिद्ध हा शब्द पूर्णत्व पावलेल्या माणसासाठीही वापरतात, आणि नीट शिजलेल्या अन्नासाठीही.