श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
पिकलेली सुपारी
“देहाला सुरुवात आहे, म्हणून त्याला अंतही असलाच पाहिजे. देह मरणारच; आत्मा मरत नाही. आत्मा देहापासून वेगळा असतो. देवाचे दर्शन होईपर्यंत आत्मा आणि देह एकच आहेत, असे मानल्याशिवाय राहवत नाही. अज्ञानी माणसाला, ज्याला देव दिसलेला नाही त्याला, ही कल्पना चिकटून राहते. ज्ञान्याला मात्र स्पष्ट दिसते की आत्मा म्हणजे देह नव्हे. “कच्च्या सुपारीची साल आतल्या सुपारीला घट्ट चिकटलेली असते; दोन्ही वेगळ्या करणे फार कठीण असते. पिकलेल्या सुपारीचे तसे नसते. तिची साल आता चिकटलेली नसते; ती हलवली, तर आत सुपारी खुळखुळताना जाणवते.”
सुपारी म्हणजे पोफळीच्या झाडाचे कठीण फळ; भारतात ती विड्याच्या पानाबरोबर खातात. ब्राह्मो नेते केशवचंद्र सेन यांच्या घरी श्रीरामकृष्ण हे म्हणाले. केशवचंद्र तेव्हा गंभीर आजारी होते, आणि थोड्याच दिवसांत ते वारले.