श्रीरामकृष्ण परमहंस · ईश्वरदर्शन
पितळेचे भांडे आणि सोन्याचे भांडे
“हो, पण भांडे सोन्याचे असेल, तर ते रोज घासावे लागत नाही. जो देवापर्यंत पोचला, त्याला प्रार्थना आणि तपश्चर्या यांची पुढे गरज उरत नाही.”
तोतापुरींना श्रीरामकृष्णांनी दिलेले हे उत्तर. तोतापुरी हे नग्न राहणारे, फिरते संन्यासी; त्यांनी श्रीरामकृष्णांना वेदान्त, म्हणजे ज्ञानमार्ग, शिकवला. तोतापुरी म्हणत, “पितळेचे भांडे रोज घासले नाही, तर ते काळवंडते. तसेच, माणसाने रोज देवाचे ध्यान केले नाही, तर त्याचे हृदय मलिन होईल.”