श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
बगळा आणि पारधी
“एक बगळा मासा पकडण्यासाठी हळूहळू चालत होता. त्याच्या मागे एक पारधी त्याच्यावर बाण रोखून उभा होता, पण बगळ्याचे तिकडे अजिबात लक्ष नव्हते. अवधूताने बगळ्याला नमस्कार केला आणि म्हटले, ‘मी ध्यानाला बसेन, तेव्हा मला तुझा कित्ता गिरवता येवो. माझ्या मागे कोण आहे, हे पाहायला मी कधीही मागे वळू नये.’”
अवधूत म्हणजे सगळ्या सांसारिक बंधनांतून मुक्त असलेला, फिरता साधू. भागवतात असा एक अवधूत एका राजाला सांगतो, की मी चोवीस गुरूंकडून शिकलो आहे. अवधूताचे असे अनेक धडे श्रीरामकृष्णांनी सांगितले.