श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
डोक्यावरचे हंडे
“खेड्यातल्या मुली डोक्यावर एकावर एक असे चार-पाच पाण्याचे हंडे घेऊन जातात. वाटभर त्या एकमेकींशी सुखदुःखाच्या गोष्टी करत जातात, तरी एक थेंबसुद्धा सांडत नाहीत. सद्गुणाच्या वाटेवरच्या वाटसरूने असेच चालावे. परिस्थिती कशीही असो, त्याचे मन खऱ्या मार्गावरून ढळणार नाही, याची त्याने नेहमी काळजी घ्यावी.”