श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
एकदाच म्हणा
“देवाचे नाव घ्या; तुमचे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतील, हे नक्की समजा. आयुष्यभर पापाच्या आणि नरकाच्या आगीच्या गोष्टी कशाला करत बसता? एकदाच म्हणा, ‘भगवंता, जे करायला नको होते, ते मी केले; आणि जे करायला हवे होते, ते केले नाही. भगवंता, मला क्षमा कर!’ एवढे म्हणा, त्याच्या पवित्र नावावर श्रद्धा ठेवा, म्हणजे तुम्ही सगळ्या पापांतून शुद्ध व्हाल.”