श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
रत्नांची पेटी
“हा देह जर कवडीमोलाचा आणि क्षणभंगुर आहे, तर धार्मिक, भाविक माणसे त्याची काळजी का घेतात? रिकाम्या पेटीची कुणी काळजी घेत नाही. पण मौल्यवान रत्ने, सोने आणि किमती वस्तूंनी भरलेली पेटी प्रत्येकजण जिवापाड जपतो. ज्या देहात ईश्वर वास करतो, त्याची काळजी घेतल्यावाचून धार्मिक जीवाला राहवत नाही; कारण आपल्या सगळ्यांचे देह म्हणजे देवाचे खेळण्याचे अंगण.”