श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
सगळे खाणारी गाय
“देवाचे ज्ञान श्रद्धेच्या बरोबरीने वाढते. जिथे श्रद्धा थोडी, तिथे पुष्कळ ज्ञानाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. खाण्याबाबत नखरे करणारी गाय फारसे दूध देत नाही. पण दुसरी एखादी गाय रानपाला, पाने, गवत, भुसा, पेंढा असे जे मिळेल ते आनंदाने खाते. ती सगळे भरपेट खाऊन फस्त करते, आणि भरपूर दूध देते. तिच्या आचळांतून दुधाच्या धारा चरवीत धो धो पडतात.”