श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
संन्याशाची भगवी वस्त्रे
“भक्ताने एखादा विशिष्ट पोशाख घालावा का? साजेसा पोशाख घालणे चांगले. संन्याशाची भगवी वस्त्रे घातलेला, किंवा देवाची गाणी गात फिरणाऱ्यासारखे खंजिरी-टाळ हाती घेतलेला माणूस कधीही थिल्लर, अभद्र शब्द बोलू शकत नाही. अभद्र गाणीही गाऊ शकत नाही. पण छैलबटाऊसारखा नटूनथटून फिरणाऱ्या माणसाचे मन साहजिकच हीन विचारांकडे आणि हीन गाण्यांकडे ओढले जाते.”
संन्याशाने घरदार आणि संसार सोडलेला असतो; त्याची वस्त्रे भगव्या रंगात रंगवलेली असतात. देवाची गाणी गात फिरणारा हा एक धार्मिक भिक्षेकरी असतो. तो भिक्षा मागून जगतो, आणि गावोगाव फिरून देवाची स्तुती गातो.