श्रीरामकृष्ण परमहंस · साधना
श्रद्धेचा उपचार
“भारतात श्रद्धेच्या बळावर रोग बरे करणारे लोक असतात. ते रोग्याला पूर्ण खात्रीने म्हणायला सांगतात, ‘माझ्यात कोणताही रोग नाही, अजिबात रोग नाही.’ रोगी तसे म्हणत राहतो, आणि जसजसे त्याचे मन रोग नाकारते, तसतसा रोग निघून जातो. तसेच, तुम्ही नैतिकदृष्ट्या दुबळे आहात, तुमच्यात काहीच चांगले नाही, असे तुम्हाला वाटत राहिले, तर लवकरच तुम्ही खरोखर तसेच आहात, असे तुम्हाला दिसेल. तुमच्यात मोठे सामर्थ्य आहे, हे जाणा, त्यावर विश्वास ठेवा; मग शेवटी ते सामर्थ्य तुम्हाला लाभेल.”