श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि माया
बांबूच्या सापळ्यातले मासे
“बांबूच्या सापळ्यातून वाहणारे पाणी चमचमताना दिसले, की लहान लहान मासे मोठ्या आनंदाने त्यात शिरतात. एकदा आत शिरले की त्यांना पुन्हा बाहेर पडता येत नाही; ते अडकतात. तसेच मूर्ख लोक संसाराच्या खोट्या झगमगाटाला भुलून संसारात शिरतात. सापळ्यात शिरणे सोपे, पण बाहेर पडणे कठीण. तसेच संसारात शिरणे सोपे, पण एकदा शिरल्यावर तो सोडणे कठीण.”
संसारात शिरणे (बंगालीतही संसार हाच शब्द) म्हणजे लग्न करून गृहस्थाचे जीवन सुरू करणे: कुटुंब, काम आणि पैसा यांची जबाबदारी घेणे.