श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि माया
चतुर कावळा
“सगळ्या पक्ष्यांत कावळा सर्वांत चतुर मानला जातो, आणि तो स्वतःलाही तसेच समजतो. तो कधी जाळ्यात सापडत नाही. धोक्याची जराशी चाहूल लागली तरी तो उडून जातो, आणि मोठ्या हुशारीने अन्न पळवतो. पण एवढी सगळी चतुराई असूनही त्याच्या वाट्याला घाण आणि उकिरड्यावरचा कचराच येतो; त्याहून चांगले काही नाही. कुडमुड्या वकिलाची हुशारी असली की असेच होते.”
कुडमुडा वकील म्हणजे लहान गावातला वकील. तो छोट्या-छोट्या खटल्यांत डावपेच खेळून आणि शब्दांचा कीस काढून पोट भरतो: खूप तल्लख, पण सगळे थोड्याशा फायद्यासाठी.