श्रीरामकृष्ण परमहंस · संसार आणि माया
दुधाची तहान
“काही माणसांना संसारात बांधून ठेवणारे काहीच नसते, तरीही ते स्वतःहून आसक्ती जोडतात, आणि अशा रीतीने स्वतःला या जगाशी बांधून घ्यायला पाहतात. त्यांना मुक्त व्हायचे नसते, मुक्ती त्यांना आवडत नाही. ज्याला सांभाळायला कुटुंब नाही, पाहायला नातेवाईक नाहीत, अशा माणसाचे पाहा. तो बहुधा सोबतीसाठी मांजर, माकड, कुत्रा किंवा एखादा पक्षी पाळतो. असा तो दुधाची तहान नुसत्या फाटलेल्या दुधाच्या पाण्यावर भागवतो. माणसांवर मायेची सत्ता अशी असते.”
दूध फाडून त्यातला घट्ट भाग काढून घेतला, की उरते ते पातळ, पाणचट द्रव म्हणजे फाटलेल्या दुधाचे पाणी. येथे माया म्हणजे माणसाला संसारात बांधून ठेवणारी ओढ.