“स्प्रिंगच्या गादीवर बसले की ती दबते, पण भार काढला की लवकरच ती पुन्हा पूर्वीसारखी होते. संसारी लोकांचे असेच असते. धर्माच्या गोष्टी ऐकत असतात तोवर ते भक्तिभावाने भरून गेलेले असतात. पण संसाराच्या रोजच्या रहाटगाड्यात परत गेले, की ते सगळे उच्च, उदात्त विचार विसरतात, आणि पूर्वीसारखेच मलिन होतात.”