निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
संतोष हेच परम धन
सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति । कन्दैः फलैर्मुनिवराः क्षपयन्ति कालं सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ॥
साप वारा पिऊन जगतात, तरी दुर्बल नसतात. रानहत्ती वाळलेले गवत खाऊन बलवान होतात. श्रेष्ठ मुनी कंदमुळे आणि फळांवर दिवस काढतात. संतोष हाच माणसाचा सर्वात मोठा ठेवा.