निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणउपदेश सोपा, आचरण कठीणपरोपदेशे पाण्डित्यं सर्वेषां सुकरं नृणाम् । धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित् सुमहात्मनः ॥दुसऱ्यांना उपदेश करताना शहाणपण दाखवणे सगळ्यांनाच सोपे असते. स्वतः धर्माप्रमाणे वागणे मात्र एखाद्याच महात्म्याला जमते.