संपूर्णकुंभो न करोति शब्दं अर्धो घटो घोषमुपैति नूनम् । विद्वान् कुलीनो न करोति गर्वं गुणैर्विहीना बहु जल्पयंति ॥
पूर्ण भरलेला घडा आवाज करत नाही, पण अर्धा भरलेला घडा मात्र खूप आवाज करतो. त्याचप्रमाणे खरा विद्वान व सुसंस्कारी माणूस कधी गर्व करत नाही, तर ज्यांच्यात खरे गुण नसतात तेच जास्त बडबड करतात.