मरणान्तानि वैराणि निवृत्तं नः प्रयोजनम् । क्रियतामस्य संस्कारो ममाप्येष यथा तव ॥
वैर मृत्यूबरोबर संपते; आपला हेतू साध्य झाला आहे. त्याचे अंत्यसंस्कार करा; आता तो जितका तुझा, तितकाच माझाही आहे. मेलेल्या शत्रूविषयी त्याच्याच भावाला उद्देशून हे शब्द उच्चारले आहेत.