निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
असे सज्जन किती आहेत
मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णाः त्रिभुवनमुपकारश्रेणिभिः प्रीणयन्तः । परगुणपरमाणून् पर्वतीकृत्य नित्यं निजहृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः ॥
काही माणसे मनाने, वाणीने आणि कृतीने पुण्यरूपी अमृताने भरलेली असतात. उपकारांमागून उपकार करून ती त्रिभुवनाला आनंद देतात. इतरांच्या कणभर गुणांचा पर्वत करून ती मनोमन फुलून येतात. असे सज्जन किती आहेत?