निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
दान देण्याची पद्धत
ये के च अस्मत् श्रेयांसो ब्राह्मणाः तेषां त्वया आसनेन प्रश्वसितव्यम् । श्रद्धया देयम् अश्रद्धया अदेयम् श्रिया देयम् ह्रिया देयम् भिया देयम् संविदा देयम् ॥
आपल्यापेक्षा श्रेष्ठांचा मान राखावा: असे ब्राह्मण आले, तर त्यांना आसन देऊन विश्रांती द्यावी. आणि दान देताना श्रद्धेने द्यावे; श्रद्धा नसेल तर देऊ नये. भरभरून द्यावे, नम्रपणे द्यावे, आदरयुक्त भीतीने द्यावे, आणि समजुतीने व सद्भावाने द्यावे.