निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणबरोबर येतात फक्त दोन गोष्टीअन्यो धनं प्रेतगतस्य भुङ्क्ते वयांसि चाग्निश्च शरीरधातून् । द्वाभ्यामयं सह गच्छत्यमुत्र पुण्येन पापेन च वेष्ट्यमानः ॥मेलेल्या माणसाचे धन दुसराच भोगतो, आणि त्याचे शरीर पक्षी व अग्नी खाऊन टाकतात. परलोकी तो फक्त दोन गोष्टींसह जातो—आपले पुण्य आणि पाप.