निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणदुर्मिळ गुणविरला जानन्ति गुणान् विरलाः कुर्वन्ति निर्धने स्नेहम् । विरलाः परकार्यरताः परदुःखेनापि दुःखिता विरलाः ॥फार थोडे लोक गुण ओळखतात, फार थोडे गरिबांवर प्रेम करतात. फार थोडे दुसऱ्यांच्या कामी झटतात, आणि फार थोडे दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतात.