निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
वाणी हेच खरे भूषण
केयूराणि न भूषयन्ति पुरुषं हारा न चन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजाः । वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ॥
बाजूबंद माणसाला भूषवत नाहीत, चंद्रासारखे उज्ज्वल हारही नाहीत; स्नान, उटी, फुले किंवा सजवलेले केसही नाहीत. फक्त सुसंस्कृत वाणीच माणसाला खरी शोभा देते. इतर सर्व भूषणे झिजून जातात, पण वाणीचे भूषण हेच कायमचे भूषण.