निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
श्रेय आणि प्रेय
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद् वृणीते ॥
श्रेय म्हणजे हिताचे आणि प्रेय म्हणजे गोड वाटणारे; ही दोन्ही प्रत्येक माणसासमोर येतात. शहाणा माणूस दोन्हींची नीट पारख करतो आणि प्रेयापेक्षा श्रेय निवडतो. मंदबुद्धी माणूस मात्र मिळवण्याच्या आणि राखण्याच्या हव्यासापोटी प्रेय निवडतो.