निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
गीतेचे अमृत
सर्वोपनिषदो गावः दोग्धा गोपालनंदनः । पार्थो वत्सः सुधीः भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥
उपनिषदे या गायी आहेत, आणि गोपालपुत्र श्रीकृष्ण त्यांचे दूध काढतात. अर्जुन हे वासरू, ज्याच्यासाठी गायींना पान्हा फुटतो; आणि ज्ञानी लोक ते दूध पितात. ते दूध म्हणजे गीता, एक महान अमृत.