निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
महाजनांचा मार्ग
तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम् । धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ॥
तर्काला ठाम आधार नसतो, शास्त्रे वेगवेगळे सांगतात, आणि ज्याचे वचन अंतिम मानावे असा एकही मुनी नाही. धर्माचे खरे तत्त्व जणू खोल गुहेत दडलेले आहे; ते कोणालाच स्पष्ट दिसत नाही. म्हणून थोर लोक ज्या वाटेने गेले, तीच खरी वाट.