निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
कोण काय हिरावून घेते
जरा रूपं हरति धैर्यमाशा मृत्युः प्राणान् धर्मचर्यामसूया । क्रोधः श्रियं शीलमनार्यसेवा ह्रियं कामः सर्वमेवाभिमानः ॥
वृद्धत्व सौंदर्य हिरावते, आशा धैर्य हिरावते, मृत्यू प्राण हिरावतो, आणि मत्सर धर्माचरण हिरावतो. क्रोध ऐश्वर्य नष्ट करतो, दुर्जनांची संगत चारित्र्य बिघडवते, वासना लज्जा हिरावते, पण अभिमान मात्र सर्वस्वच हिरावून घेतो.