निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरणथोरांची निरिच्छताउदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणम् । विरक्तस्य तृणं भार्या निस्पृहस्य तृणं जगत् ॥उदार माणसाला धन गवताच्या काडीसारखे वाटते. शूराला मृत्यू काडीमोल वाटतो. विरक्ताला पत्नी काडीमोल वाटते. आणि ज्याला कसलीच इच्छा नाही, त्याला सारे जगच काडीमोल वाटते.