लौकिकानां हि साधूनाम् अर्थं वागनुवर्तते । ऋषीणां पुनराद्यानां वाचम् अर्थोऽनुधावति ॥
सामान्य सज्जनांचे शब्द वस्तुस्थितीला धरून असतात. प्राचीन ऋषींचे मात्र उलट होते: वस्तुस्थितीच त्यांच्या शब्दांमागे धावत असे, कारण ते जे बोलत ते खरे ठरे. म्हणूनच ऋषींचा वर किंवा शाप कधी वाया जात नसे.