निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्न
गुरु-शिष्याची प्रार्थना
ॐ सह नाववतु सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
ईश्वर आम्हा दोघांचे, गुरू आणि शिष्याचे, एकत्र रक्षण करो; आम्हा दोघांचे एकत्र पोषण करो. आम्ही मिळून जोमाने परिश्रम करू. आमचे अध्ययन तेजस्वी होवो, आणि आमच्यात कधीही द्वेष न येवो. ॐ शांती, शांती, शांती. पाठ सुरू करण्यापूर्वी गुरू आणि शिष्य ही प्रार्थना एकत्र म्हणतात.