निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्न
दृढनिश्चयी मन
क्वचिद्भूमौ शय्या क्वचिदपि च पर्यङ्कशयनं क्वचिच्छाकाहारी क्वचिदपि च शाल्योदनरुचिः । क्वचित्कन्थाधारी क्वचिदपि च दिव्याम्बरधरो मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं न च सुखम् ॥
कधी जमिनीवर झोप तर कधी मऊ पलंग, कधी नुसती भाजी तर कधी उत्तम भात, कधी फाटकी गोधडी तर कधी सुंदर वस्त्रे. ध्येयाला वाहिलेला मनस्वी माणूस सुख-दुःख मोजत नाही.