निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्न
जेव्हा मला थोडेसे कळत होते
यदा किञ्चिज्ज्ञोऽहं गज इव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मीत्यभवदवलिप्तं मम मनः । यदा किञ्चित्किञ्चिद्बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः ॥
जेव्हा मला थोडेसे कळत होते, तेव्हा मी मदोन्मत्त हत्तीसारखा गर्वाने आंधळा झालो होतो. माझ्या मनाला वाटे, ‘मी सर्वज्ञ आहे.’ मग विद्वानांकडून थोडेथोडे शिकलो, तेव्हा कळले की मी तर मूर्ख आहे, आणि माझा गर्व तापासारखा उतरला.