निवडक सुभाषिते · Wit & Riddles
शब्दांतील फरक
अहं च त्वं च राजेन्द्र लोकनाथावुभावपि । बहुव्रीहिरहं राजन् षष्ठीतत्पुरुषो भवान् ॥
हे राजा, तुम्ही आणि मी दोघेही ‘लोकनाथ’ आहोत. तुम्ही ‘लोकांचे नाथ’, म्हणजे जगाचे स्वामी; आणि मी ‘लोक ज्याचे नाथ आहेत’ असा, म्हणजे सगळ्यांवर अवलंबून असलेला गरीब. एकाच शब्दाचा समास दोन प्रकारे सोडवला की एक राजा ठरतो आणि दुसरा याचक.